मुंबई

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा; केंद्र सरकारचे राज्याच्या मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना निर्देश

बांगलादेश व म्यानमारमधून आलेल्या बेकायदा घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : बांगलादेश व म्यानमारमधून आलेल्या बेकायदा घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना दिले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी बांगलादेशी व म्यानमारमधून बेकायदा घुसखोराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. शेवाळे यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, टीसने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

हिंदूंची लोकसंख्या घसरण्याची भीती व्यक्त

१९६१ च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ही ८८ टक्के होती. २०११ च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या ६६ टक्क्यांपर्यंत घसरली. हीच टक्केवारी २०५१ पर्यंत ५४ टक्क्यांवर पोहोचेल, अशी भीती राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था या घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा थेट आरोप शेवाळे यांनी केला आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर सामाजिक संस्थांवर देखील कारवाई करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती