मुंबई

ऑक्टोबर महिन्यापासून ‘५ जी’ सेवा सुरू होणार,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

५ जी’ स्पेक्ट्रम लिलावाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल दूरसंचार क्षेत्राचे आभार मानतो

प्रतिनिधी

भारतात येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ‘५ जी’ सेवा सुरू होणार आहे. येत्या एक ते दोन वर्षांत ही सेवा संपूर्ण देशात पसरेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

‘भारतात ५ जी’च्या संधी’ या विषयावर पत्रकारांशी बोलताना वैष्णव बोलत होते. ते म्हणाले की, ‘५ जी’ स्पेक्ट्रम लिलावाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल दूरसंचार क्षेत्राचे आभार मानतो. ५ जी सेवा भारतात ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होईल. ५ जी स्पेक्ट्रमचे लिलाव येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर स्पेक्ट्रमचे वाटप सुरू होईल. वाटप झाल्यानंतर तातडीने ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. वैष्णव यांनी मुंबईत झालेल्या दूरसंचार क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेच्या सांगता सोहळ्यात सहभाग घेतला. “५-जी ऑपरेशन्स’ मधील ‘गुंतवणुकीच्या संधी आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा’ यावर या परिषदेत विशेष भर देण्यात आला होता. भारताने ५-जी आणि ६-जी अशा तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्पेक्ट्रम लिलाव यशस्वी होण्याबाबत ते म्हणाले की, “एकीकडे आम्ही राखीव किंमत कमी केली तर दुसरीकडे, आम्ही स्पेक्ट्रम वापराचे शुल्क कमी केले; हा एक महत्वाचा बदल होता. त्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळण्याची खात्री होती. तर दुसरीकडे, पैसे देण्याच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यात आला. आधीच्या लिलावात सुरुवातीलाच एकरकमी पैसे द्यावे लागत होते. मात्र, आता सगळी रक्कम २० हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आम्ही दिली आहे. यामुळे पेमेंट करण्यासाठीचा दबाव कमी झाला आहे. त्यामुळे ऑपरेटर्स, नेटवर्कची व्याप्ती वाढवण्यावर भर देऊ शकतात. तिसरे म्हणजे, आधी खूप मोठी बँक हमी द्यावी लागत असे, ज्याचा मोठा भार कंपन्यांवर पडत असे, आता ती रद्द करण्यात आली आहे.”

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले