मुंबई

डोंगरावर बैसली, माझगावची वैकुंठ माता; गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा

मुंबईत पेशवेकालीन अनेक मंदिरे असून त्यापैकी एक म्हणजे माझगाव येथील डोंगरावर वसलेले वैकुंठ माता गावदेवी मंदिर आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

मुंबईत पेशवेकालीन अनेक मंदिरे असून त्यापैकी एक म्हणजे माझगाव येथील डोंगरावर वसलेले वैकुंठ माता गावदेवी मंदिर आहे. ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

मुंबादेवी प्रमाणेच माझगाव जवळच्या डोंगरावरची वैकुंठ माता मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखली जात आहे. गावदेवी मंदिरात स्वयंभू शिवलिंग मूर्ती असून महाशिवरात्रीला भक्तांची मोठी गर्दी होते. लग्न जमल्यानंतर पत्रिका ठेवण्यासाठी भक्त आजही गावदेवी मंदिरात येतात. एरव्ही फारशी गर्दी होत नसली तरी नवरात्रौत्सव याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते. गावदेवी मंदिरात दरवर्षी चैत्र पौर्णिमाला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यादिवशी माझागव मधील माहेरवाशीण मुली पालखीत सहभागी होण्यासाठी आवर्जून येतात हे विशेष.

या गावदेवी मंदिरात ये-जा करण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिर परिसरात जलाशय असून नवीन जलाशय बांधण्यात येणार आहे. तसेच, जलाशयपर्यंत पूलही उभारण्यात येणार आहे. पुलाचे काम पूर्ण होऊन सेवेत आल्यानंतर भक्तांना मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार नाहीत.

मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा!

गावदेवी डोंगरावर वसलेली असून मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा अशी भावना मंदिराचे व्यवस्थापक सिद्धार्थ नारायण शेणवी यांनी दैनिक ‘नवशक्ति'शी बोलताना व्यक्त केली.

चिमाजी अप्पा दर्शनाला आले होते !

त्या काळात सायन किल्ला, शिवडी किल्ला व माझगाव येथील डोंगरावर पेशव्यांचे सैन्य, दारुगोळा, शस्त्रे ठेवली जात होती. वसईचा किल्ला सर करण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी गावदेवीला नवस केला होता. त्यानंतर झालेल्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करत वसईचा किल्ला सर केला. त्यानंतर चिमाजी अप्पा गावदेवीच्या दर्शनाला आले आणि नवस फेडला, असे महत्त्व गावदेवी मंदिराला प्राप्त झाले आहे.

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...