समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय   X @fpjindia
मुंबई

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

वसई किनाऱ्यापासून सुमारे ६६ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात गेल्या दहा दिवसांपासून एक रहस्यमय गोलाकार रिंगण दिसून येत आहे. मासेमारी करून परत येणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही विचित्र घटना आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या असामान्य सागरी घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तांत्रिक तपासणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Krantee V. Kale

वसई : वसई किनाऱ्यापासून सुमारे ६६ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात गेल्या दहा दिवसांपासून एक रहस्यमय गोलाकार रिंगण दिसून येत आहे. मासेमारी करून परत येणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही विचित्र घटना आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

थोडक्यात बचावली बोट

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच वसईहून गेलेली एक मासेमारी नौका या गोलाकार वर्तुळात अडकली होती. मात्र सुदैवाने नौकेच्या चालकाने प्रसंगावधान राखत, इंजिनचा वेग वाढवून नौका सुरक्षितपणे बाहेर काढली. कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची ही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार वर्तुळ तयार झाले होते. या रिंगणातून मातेरी रंगाचे पाणी निदर्शनास आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेनंतर मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून हा प्रकार समुद्राखालील ज्वालामुखी हालचालींशी संबंधित असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.

तातडीने सखोल तपासणीची मागणी

पालघर जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्र मानले जाते. येथे दरवर्षी २०० हून अधिक सौम्य भूकंप नोंदवले जात असल्याने स्थानिक नागरिक आणि मच्छिमार अधिक सतर्क झाले आहेत. सागरी जीव संरक्षण कार्यकर्ते जनार्दन मेहर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या भागाची भूकंपीय संवेदनशीलता लक्षात घेता, या असामान्य सागरी घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तांत्रिक तपासणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

महापालिका निवडणुकांत ‘नोटा’ चा राजकीय इशारा! ठाणेकरांमध्ये असंतोष; उल्हासनगरमध्ये नाराजीचा स्फोट