वसईतील फादर हिलरी फर्नांडिस कालवश! ख्रिस्ती धर्मगुरूवर हिंदू पद्धतीने होणार अग्नीसंस्कार! 
मुंबई

वसईतील फादर हिलरी फर्नांडिस कालवश! ख्रिस्ती धर्मगुरूवर हिंदू पद्धतीने होणार अग्नीसंस्कार!

फादर फर्नांडिस यांनी स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांचा ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन विधी न होता...

Swapnil S

वसई : ख्रिस्ती धर्माचे भारतीयकरण करण्यात मोलाचे योगदान असलेले प्रख्यात वसईकर ख्रिस्ती धर्मगुरू हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते.

फादर फर्नांडिस यांनी स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांचा ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन विधी न होता, हिंदू संस्कृतीप्रमाणे पाचुंबंर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ख्रिस्ती उपासनेत क्रांती घडवून आणणारे आणि ख्रिस्ती धर्माच्या मराठीकीकरणात मोलाचा वाटा असणारे ख्रिस्ती धर्मगुरू हिलरी फर्नांडिस यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल वसई विरारसह विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. गुरुवार, २२ जानेवारी सकाळी त्यांचे पार्थिव उत्तन येथील लेडी ऑफ दि सी चर्च येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आज, दि. २३ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत फादर हिलरी यांचे पार्थिव वसई पश्चिमेच्या तरखड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता महापालिकेच्या पाचुंदर येथील हिंदूंच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हिलरी फर्नांडिस यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३८ साली वसईतील तरखड गावात झाला होता. डिसेंबर १९७२ मध्ये त्यांना ख्रिस्ती धर्मगुरूपदाची दीक्षा मिळाली. त्यांनी वसई आणि मुंबई धर्मप्रांतात सेवा कार्य केले आहे. सुरुवातीची अनेक वर्षे ते गिरीज येथील जीवन दर्शन केंद्राचे संचालक होते.

फादर हिलरी फर्नांडिस हे वास्तववादी होते. पण त्यांनी केलेल्या लेखन आणि भाषणातून ते नास्तिक असतील असं अनेकांना वाटायचं. पण नंतर त्या अस्तिकासारखी येशूची उपासना देखील करायचे. त्यामुळे मराठी ख्रिस्ती धर्मात क्रांती घडवून आणणारे फादर हिलरी यांचे व्यक्तिमत्त्व शब्दात मांडणे कठीण आहे.
रेमंड मच्याडो, ज्येष्ठ लेखक

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय