वसई-विरार महापालिकेच्या समिती निवडणुकांसाठी मुहूर्त सापडला; ८ मे रोजी आरोग्य व महिला-बालकल्याण समिती सभापतींची निवडणूक 
मुंबई

वसई-विरार महापालिकेच्या समिती निवडणुकांसाठी मुहूर्त सापडला; ८ मे रोजी आरोग्य व महिला-बालकल्याण समिती सभापतींची निवडणूक

वसई-विरार शहर महानगरपालिका मधील रखडलेल्या समिती निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून, आरोग्य समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुका येत्या ८ मे रोजी होणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका मधील रखडलेल्या समिती निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून, आरोग्य समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुका येत्या ८ मे रोजी होणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.

महापालिकेतील नऊ प्रभाग समित्यांच्या सभापतींसह विविध समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित होत्या. प्रभाग समित्यांच्या फेररचनेवरून सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजपने फेररचनेत सत्ताधाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप केला होता, तर बहुजन विकास आघाडीने राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून निवडणुका मुद्दाम लांबवल्या जात असल्याचा दावा केला होता.

जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि स्थायी समिती सभापती यांसारख्या पदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र, आरोग्य, महिला व बालकल्याण, परिवहन तसेच प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका प्रलंबितच राहिल्या होत्या. दरम्यान, महापौर अजीव पाटील यांनी भाजप आमदारांच्या हस्तक्षेपामुळे निवडणुका रखडल्याचा आरोप केला होता. बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी राजकीय डावपेच रचले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

अखेर आरोग्य आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांची प्रतीक्षा संपली असून, महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे.या निवडणुकांसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड या पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी