वसईतही फटाके, डीजेवर कडक निर्बंध 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

वसईतही फटाके, डीजेवर कडक निर्बंध

दिवाळीच्या उत्साहात नियम धाब्यावर बसवून फटाके फोडणे आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याचे प्रकार आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मुंबईपाठोपाठ वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात दिवाळीदरम्यान २०० हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने प्रशासनासमोर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Swapnil S

मुंबई : दिवाळीच्या उत्साहात नियम धाब्यावर बसवून फटाके फोडणे आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याचे प्रकार आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मुंबईपाठोपाठ वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात दिवाळीदरम्यान २०० हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने प्रशासनासमोर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अखेर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत फटाके, विनापरवाना डीजे आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लेझर लाईट्सवर निर्बंध लागू केले आहेत.

सोमवारी सायंकाळी वसई-विरार आणि मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना न्यायालयाच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत

पोलिसांची गस्त

याशिवाय गर्दीची ठिकाणे, निवासी परिसर आणि संवेदनशील भागांत पोलीस अधिकारी डेसिबल मीटरच्या मदतीने तपासणी व गस्त घालणार आहेत. वाहनचालक आणि नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होईल अशा तीव्र लेझर आणि बीम लाईट्सवरही कारवाई केली जाणार आहे. नागरिक किंवा संस्थांकडून तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गिरगाव चौपाटीवर छठपूजेला परवानगी देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा तातडीचा दिलासा नाही

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

नंदीग्राम फाईल्स पुन्हा उघडणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा

अमेरिका पाकिस्तानमध्ये राजदूत नेमणार; नताली बेकर यांची वर्णी लागणार? ट्रम्प यांनी केली शिफारस, सिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का