वसई-विरार महानगरपालिका परिवहनचा उपक्रम; विरार-शिरगाव दरम्यान पालिकेची बससेवा सुरू 
मुंबई

वसई-विरार महानगरपालिका परिवहनचा उपक्रम; विरार-शिरगाव दरम्यान पालिकेची बससेवा सुरू

चारधामपैकी एक मानल्या जाणाऱ्या द्वारकाधीश मंदिर या श्रीकृष्ण मंदिराची प्रतिकृती विरार पूर्वेतील शिरगाव येथे उभारण्यात आली असून, या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

Swapnil S

वसई : चारधामपैकी एक मानल्या जाणाऱ्या द्वारकाधीश मंदिर या श्रीकृष्ण मंदिराची प्रतिकृती विरार पूर्वेतील शिरगाव येथे उभारण्यात आली असून, या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या मंदिरामुळे वसई-विरार परिसरातील पर्यटनस्थळांत मोठी भर पडली असून, सुट्टीच्या दिवशी तसेच दैनंदिनही येथे मोठी गर्दी होत आहे.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी माजी तथा प्रथम महिला महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी महापालिकेकडे विरार ते शिरगाव मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने १ मेपासून विरार ते द्वारकाधीश मंदिर, शिरगाव अशी बससेवा सुरू केली आहे. या बससेवेचा शुभारंभ उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी नगरसेविका अमृता चोरघे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळी ७.३५ वाजता विरार पूर्व येथून पहिली बस सुटते, तर शिरगाव येथून विरार स्टेशनकडे जाणारी शेवटची बस रात्री १०.५० वाजता आहे. दर अर्ध्या तासाने ही बससेवा उपलब्ध असून, भाविकांच्या सोयीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रविणा ठाकूर यांनी केले आहे.

१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिराची स्थापना

दरम्यान, गुजरातमधील द्वारका शहरातील गोमती नदीकाठी वसलेले द्वारका येथील मुख्य द्वारकाधीश मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित राष्ट्रीय तीर्थस्थळ असून, चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. हिंदू पुराणानुसार द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती. विरारमधील या मंदिराची उभारणी प्रविणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. सुमारे १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चार महिन्यांपूर्वी प्राणप्रतिष्ठेद्वारे या मंदिराची स्थापना करण्यात आली. महापालिकेची बससेवा सुरू झाल्याने भाविकांना आता स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून, मंदिराच्या लोकप्रियतेत आणखी भर पडत आहे.

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी