मुंबई

पालघरमध्ये ब्रिजवरुन कोसळला ऑइल टँकर, चालकाचा मृत्यू; भीषण अपघाताचा Video व्हायरल

टँकर आधी कठड्याला धडकला आणि नंतर थेट पंधरा ते वीस फूट खाली रस्त्यावर कोसळला. लगेचच टँकरला आग लागली. त्यानंतर रस्त्यावर काहीसा गोंधळ उडाला आणि लोक घाबरुन पळू लागले.

Krantee V. Kale

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून ऑइल वाहून नेणारा टँकर रविवारी (दि.३०) संध्याकाळी थेट रस्त्यावर कोसळला. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. सुदैवाने टँकर कोसळला तेव्हा खालील रस्त्यावर अन्य वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.

माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईहून गुजरातच्या दिशेने निघालेला टँकर मस्तान नाका उड्डाणपूलावर अनियंत्रित होऊन आधी कठड्याला धडकला आणि नंतर थेट पंधरा ते वीस फूट खाली रस्त्यावर कोसळला. लगेचच टँकरला आग लागली. त्यानंतर रस्त्यावर काहीसा गोंधळ उडाला आणि लोक घाबरुन पळू लागले.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला मनोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तथापि, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर टँकरमधून तेलाची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसर निर्मनूष्य केला आणि वाहतूकही बंद केली होती.

मात्र, तेल ज्वलनशील नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टँकर बाजूला करुन वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

भेसळयुक्त दुधाचा दैनंदिन पुरवठा २० लाख लिटरने घटला; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दावा

Rajasthan Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, ६ जखमी

Mumbai : उघडी मॅनहोल बंदिस्त होणार; ४०० चौरस मीटर क्षेत्रातील मॅनहोलवर नवीन झाकणे, BMC १ कोटी १० लाख रुपये खर्च करणार

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव