मुंबई

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही जाहीर

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत होऊन त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या.

Swapnil S

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत होऊन त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या.

यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंद्रीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश भोवड यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी एकनाथ तांबवेकर, सचिवपदी सुप्रिया मुळगावकर, खजिनदारपदी ज्योती कपिले यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मधुमंजिरी गटणे, रविकिरण पराडकर, श्रीकांत म्हात्रे, प्रशांत राऊत, वंदना पाटील आणि विकास वराडकर यांना नेमण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अरुण तुकाराम मोर्ये यांनी काम पाहिले.

येते चार दिवस मुंबई परिसरात ऑरेंज अलर्ट

GST ची हंडी उतरणार; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केली दरात व्यापक बदलाची घोषणा

स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी त्याग करणे आवश्यक! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे-सेना युती; खासदार संजय राऊतांची घोषणा

दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या बक्षिसांची लयलूट