मुंबई

मशिदीवरील भोंग्यांचा वाद, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करा! उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

कांदिवली पूर्व येथील गौसिया मशिदीवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन

नवशक्ती Web Desk

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देताना ध्वनी प्रदूषणविषयक नियमावली तसेच याआधी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केली.

कांदिवली पूर्व येथील गौसिया मशिदीवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन होत आहे. मात्र त्याविरोधात पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा दावा करणाऱ्या याचिकेची गंभीर दखल घेत मुख्य न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोलिसांना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यासह सर्व प्रतिवादींना ९ जूनपर्यंत प्रतिज्ञपत्र सादर करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी १२ जूनला निश्चित केली.

कांदिवली पूर्वे येथे राहणाऱ्या ऍड. रीना रिचर्ड यांनी याचिका दाखल केली आहे. शांतता क्षेत्रात असलेल्या गौसिया मशिदीच्या भोंग्यांद्वारे सातत्याने मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. त्या विरोधात तक्रार करूनही पोलीस कुठलीच कारवाई करीत नाहीत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती रमेश धानुका आणि गिरीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकाकर्त्या रिचर्ड यांच्यासह सर्व प्रतिवादींना ९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकेची सुनावणी १२ जूनला निश्चित केली.

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

अर्बन कंपनी, बोट ब्रँडच्या मूळ कंपनीला IPO लाँच करण्यासाठी सेबीची परवानगी; १३ कंपन्या एकत्रितपणे १५,००० कोटी उभारणार

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी