विरार-अलिबाग मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

विरार-अलिबाग मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर

बहुचर्चित विरार- अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर करण्यासाठी डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील चंडीगाव येथील ३० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या कामाला आता गती येणार आहे.

Swapnil S

मुंबई : बहुचर्चित  विरार- अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर करण्यासाठी  डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील चंडीगाव येथील ३० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या कामाला आता गती येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत नवघर (वसई, पालघर) ते चिरनेर (उरण, रायगड) दरम्यान ८० किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गासाठी वनविभागाची जमीन वापरावी लागणार असल्याने, त्याला मंजुरी मिळवण्यासाठी वनविभागाला पर्यायी जमीन देणे आवश्यक होते. त्यानुसार चंडीगाव येथील गट क्र. ७२९ मधील एकूण २५२.९५ हेक्टर क्षेत्रापैकी ३० हेक्टर जमीन वन विभागाला पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. ही जमीन केवळ एक रुपये प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने 'एमएसआरडीसी'ला भोगवटादार वर्ग-२ म्हणून दिली जाईल.

कोकण विभागीय आयुक्त आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  सादर केलेल्या अहवालानंतर शासनाने हा निर्णय घेतला. यामुळे प्रकल्पाच्या वन मंजुरीचा सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला थेट जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यांमधील प्रवासाचा वेळ वाचून दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी