विशाखा राऊत यांना ६ वर्षे निवडणूक बंदी? (Photo-X)
मुंबई

विशाखा राऊत यांना ६ वर्षे निवडणूक बंदी?

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द केले जाणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला पत्र देत याबाबत माहिती दिली आहे. तसेच पुढील सहा वर्षे राऊत यांना निवडणूक लढवता येणार नाही, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द केले जाणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला पत्र देत याबाबत माहिती दिली आहे. तसेच पुढील सहा वर्षे राऊत यांना निवडणूक लढवता येणार नाही, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची घोषणा लवकरच मुंबई महापालिका सभागृहात केली जाणार आहे.

दादरच्या प्रभाग १९१ या मागास महिला प्रवर्गातून निवडणूक लढविताना राऊत यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राला प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदेसेनेच्या प्रिया सरवणकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राऊत यांची तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पालघर जात पडताळणी समितीने राऊत यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरविले.

जात पडताळणी समिती ही कोणाच्याही अखत्यारीत काम करत नाही. त्यांना स्वतंत्र दर्जा आहे. उद्धवसेनेला आणखी धक्के बसणार आहेत. सभागृहात येणाऱ्या नवीन नगरसेविकांचे आम्ही खुल्या दिलाने स्वागत करू. ज्यांनी निवडणूक काळात सर्टिफिकेट दिले नसतील त्यांच्या अडचणी वाढतील. अर्ज रद्द झाल्यामुळे शिंदे सेनेचे भाजपचे आकडे वाढतील.
गणेश खणकर, सभागृह नेते

राऊत यांची याचिका फेटाळली

मुंबई : उद्धवसेनेच्या दादर परिसरातील नगरसेविका विशाखा राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अवैध ठरवण्यात आल्यानंतर राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात आले होते. त्यानंतर या निर्णयाला विशाखा राऊत यांनी हायकोर्टात आव्हान दिले. परंतु तिथेही बुधवारी विशाखा राऊत यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली; शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

चीनच्या ह्युमनॉइड रोबोट क्रांतीचे वास्तव

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत