संग्रहित छायाचित्र पीटीआय
मुंबई

Mumbai Metro : वडाळा - कासारवडवली मेट्रोच्या खर्चात वाढ; प्रकल्पाला नवीन डेडलाईन

वडाळा - कासारवडवली या मेट्रो ४ प्रकल्पाच्या स्थापत्य कामात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Swapnil S

मुंबई : वडाळा - कासारवडवली या मेट्रो ४ प्रकल्पाच्या स्थापत्य कामात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्रकल्पाला ५ वर्षांची दिरंगाई झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ऑगस्ट २०२६ ची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे. मुंबई मेट्रो मार्ग- ४ वडाळा ते कासारवडावलीचे काम १२ एप्रिल २०१८ रोजी दोन कंपन्यांना देण्यात आले होते. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ हा ३२ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गामध्ये एकूण ३० स्थानके आहेत. हे काम जुलै २०२१ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाला दिरंगाई झाल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत ऑगस्ट २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.

मेट्रो ४ प्रकल्पाचा अपेक्षित खर्च २६३२.२५ कोटी इतका होता. आता यात १२७४.८० कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. खर्चात वाढ आणि ५ वर्षांची दिरंगाई लक्षात घेता कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

Mumbai : विसर्जन सुरक्षित पार पडण्यासाठी दक्षता घ्या! अतिरिक्त आयुक्त डॉ. ढाकणे यांचे निर्देश

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार