मुंबई

पश्चिम रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई

पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल, मेल एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.

Swapnil S

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल, मेल एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान पश्चिम रेल्वेने फुटक्या प्रवाशांकडून तब्बल ९३ कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे.

प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्सवर तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. त्यानुसार तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत अनेक तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेमध्ये फुकट्या प्रवाशांकडून ९३ कोटी ४७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई उपनगर विभागातून ३० कोटी ६३ लाखांचा दंड रक्कमेचा समावेश आहे. तसेच एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत सुमारे ४० हजार अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला.

केवळ महिन्याभरात १२.९१ कोटींचा दंड वसूल

तर पश्चिम रेल्वे विभागात केवळ नोव्हेंबर महिन्यात बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह २ लाख १ हजार अनियमित प्रवाशी आढळून आले. त्यांच्याकडून १२ कोटी ९१ लाखांचा दंड वसूल केला आहे. तसेच मुंबई उपनगरीय विभागात ८२ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४ कोटी ३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली