मुंबई

रविवारी पश्चिम रेल्वे विस्कळीत; प्रभादेवी-दादर दरम्यान झाड पडले; तर बोरिवलीत तांत्रिक बिघाड

पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला नव्हता; मात्र दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने रविवारी प्रवाशांची गैरसोय झाली.

Swapnil S

मुंबई : पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला नव्हता; मात्र दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने रविवारी प्रवाशांची गैरसोय झाली. प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी रेल्वे रुळावर झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, तर दुसऱ्या घटनेत बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत होत्या.

पावसाळ्याची पश्चिम रेल्वे सज्ज असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार रेल्वे मार्गावरील नाले, लहान नाल्यांमधून गाळ काढण्याचे तसेच रेल्वे रुळाजवळील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता; मात्र रविवारी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी-दादर स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील लोकल ठप्प झाल्या. घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तासाभरात झाड रुळावरून हटवले. यानंतर एक तासानंतर या मार्गावरील लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

या घटनेनंतर लगेच दुसरी घटना घडल्याने रेल्वे विस्कळीत झाली. सकाळी ८.३० च्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकात सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पुन्हा लोकल ठप्प झाल्या. त्यानंतर तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर सकाळी ९.०५ वाजता बोरिवली येथील ठप्प झालेल्या तीन मार्गिका सुरू झाल्या; मात्र, डाऊन धीम्या मार्गावरील काम पूर्ण होण्यास ९.३० वाजले. यानंतर या मार्गावरील लोकल सुरळीत सुरू करण्यात आल्या; मात्र लोकल सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी