पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होऊन रेल्वे विस्कळीत होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुसळधार पावसात ट्रॅक सर्किटमध्ये पाणी साचल्यामुळे होणारे बिघाड कमी करण्यासाठी २३९ डिजिटल ॲक्सल काऊंटर (डीएसी) बसविण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात लोकल सेवा सुरळीत चालणार आहे.

Swapnil S

मुंबई : सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होऊन रेल्वे विस्कळीत होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुसळधार पावसात ट्रॅक सर्किटमध्ये पाणी साचल्यामुळे होणारे बिघाड कमी करण्यासाठी २३९ डिजिटल ॲक्सल काऊंटर (डीएसी) बसविण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात लोकल सेवा सुरळीत चालणार आहे.

पावसाळ्यात रूळावर पाणी भरल्यास सिग्नल यंत्रणा बिघडते. यामुळे लोकल सेवा विस्कळीत होते. यावर उपाययोजना म्हणून पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, प्रभादेवी आणि भाईंदर परिसरात नव्याने डिजिटल ॲक्सल काऊंटर बसवले आहेत. यामुळे चर्चगेट-विरार विभागात एकूण ७७८ ड्युअल डिजिटल ॲक्सल काऊंटर आणि ७७३ डिजिटल ॲक्सल काउंटर ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅक सर्किटसोबत समांतर कार्यरत असणार आहेत. तसेच सर्व सिग्नल उपकरणांचे अर्थिंग तपासण्यात आले आहे.

डिजिटल ॲक्सल काऊंटर म्हणजे काय?

रेल्वे मार्गावर लोकल आहे की नाही, हे ओळखण्यासाठी डिजिटल ॲक्सल काऊंटर प्रणाली वापरण्यात येते. पाणी किंवा प्रतिकूल हवामानाचा यावर परिणाम कमी प्रमाणात होत असल्याने ही प्रणाली पावसाळ्यात उपयुक्त ठरते.-

AI मुळे नोकरीबाबत अनिश्चितता; तरुण-धोरणकर्त्यांमध्ये संवादाची गरज; नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा सल्ला

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO