मुंबई

Western Railway : मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकल रुळावरुन घसरली, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप

नवशक्ती Web Desk

मुंबई लोकलला मुंबईची जीवन वाहिनी मानलं जातं. लोकल आमि बेस्ट सेवा खोळंबली तर मुंबई जाग्यावर थांबते असं देखील म्हणतात. अशात मुंबईत्या पश्चिम रेल्वे लाईनवर लोकल रुळावरुन घसल्याची दुर्घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसल्याने या लाईवरची वाहतून ठप्प झाली आहे. ही लोकल कारशेडमध्ये जात होती. त्यामुळे लोकलमध्ये प्रवासी नव्हते. लोकल आपल्या फेऱ्या पूर्ण करुन कारशेडमध्ये असताना ही दुर्घटना घडली. लोकलचं चाक रुळावरील घसल्याने लोकससेवा विस्कळीत झाली आहे.

यानंतर पश्चिम रेल्वेकडून तातडीने लोकल ट्रकवरुन बाजूला काढण्याच काम हाती घेण्यात आलं. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम लाईनवरील सर्व लोकल यामुळे खोळंबल्या आहेत. तसंच एक नंबर प्लॅटफॉर्मचवरील सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे दादर रल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. अनेक प्रवास मरिन लाईन्स स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर लोकल उभ्या आहेत.

मुंबई सेंट्रेल स्थानकाजवळ झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला यामुळे ताटकळून राहावं लागलं. लोकल सेवा पूर्वरत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या, झाडून घेतल्या स्वतःवर गोळ्या

ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?