मुंबई

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनो लक्ष द्या! चर्चगेटहून विरारसाठी आज रात्री ११.२७ वा. शेवटची लोकल; 'ब्लॉक'मुळे वेळापत्रकात बदल

ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील गाड्या चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत. तर अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या अंदाजे १० ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकसाठी दिवसभरात अनेक गाड्या रद्द, तर काही अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने सोमवारी रात्री १२.३० ते मंगळवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही अंशतः रद्द केल्या आहेत. त्यानुसार सोमवारी रात्री विरारला जाणारी शेवटची चर्चगेट-विरार लोकल रात्री ११.२७ वाजता चर्चगेट स्थानकातून सुटणार आहे. त्यानंतर चर्चगेट-अंधेरी ही लोकल रात्री १ वाजताची शेवटची लोकल असेल.

ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील गाड्या चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत. तर अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या अंदाजे १० ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकसाठी दिवसभरात अनेक गाड्या रद्द, तर काही अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे ३० सप्टेंबर रोजी रात्री चर्चगेट स्थानकातून ११.२७ वाजता सुटणारी चर्चगेट-विरार लोकल विरारला जाणारी शेवटची लोकल असेल. ही गाडी विरारला मध्यरात्री १.१५ वाजता पोहचेल. तर चर्चगेट-अंधेरी लोकल चर्चगेटहून रात्री १ वाजता सुटणारी अखेरची लोकल असेल. तसेच विरारहून चर्चगेटसाठी रात्री ११.३० वाजता सुटणारी शेवटची लोकल असेल.

मंगळवारी पहाटे अतिरिक्त लोकल

मंगळवारी पहाटे अतिरिक्त लोकल चालविण्यात येणार आहेत. यामध्ये विरारहून बोरिवली दरम्यान पहाटे ३.२५ वाजता अतिरिक्त धीमी लोकल चालविण्यात येतील. ही लोकल बोरिवलीला पहाटे ४ वाजता पोहोचेल. तर बोरिवली-चर्चगेट धीमी लोकल बोरिवलीहून पहाटे ४.२५ वाजता सुटेल. ही लोकल अतिरिक्त लोकल म्हणून चालविण्यात येणार आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर