Woman Dance In Mumbai Local Train Viral Video 
मुंबई

Viral Video: मुंबई लोकलमध्ये बोल्ड डान्स करणं तरुणीच्या अंगलट, रेल्वे पोलिसांनी दिले कारवाईचे आदेश

काही तरुणी रील्स बनवण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये बोल्ड डान्स करतात.

Naresh Shende

शेकडो प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये भन्नाट काहीतरी करुन लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसतात. काही तरुणी रील्स बनवण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये बोल्ड डान्स करतात. अश्लील डान्स करण्याचं हे फॅड दिवसेंदिवस वाढू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेतली आहे. कारण भोजपुरी गाण्यावर लोकल ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेत रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, संया मारे सटा सट या भोजपुरी गाण्यावर एका तरुणीने अश्लील हावभाव करुन डान्स केला आहे. महिलांच्या डब्ब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

इथे पाहा तरुणीच्या बोल्ड डान्सचा व्हिडीओ

एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करुन मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वेला टॅग केलं आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत त्या पोस्टला रिप्लाय दिला आणि संबंधित प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या व्हायरल पोस्टवर नेटकरी भन्नाट मिम्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, हे गंभीर आहे. रेल्वे लोकलमध्ये सर्वांसमोर असं कृत्य करणं अयोग्य आहे.

याआधी अशाच प्रकारचा एका तरुणीचा बेली डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे