मुंबई

मालाड येथे महिलेची पतीकडून हत्या; आरोपी पतीला गुन्ह्याप्रकरणी अटक

मालाड येथे कोमल नितीन जांबळे या २५ वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने हत्या केली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून ३२ वर्षांचा आरोपी पती नितीन धोंडीराम जांबळे याला अटक केली.

Swapnil S

मुंबई : मालाड येथे कोमल नितीन जांबळे या २५ वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने हत्या केली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून ३२ वर्षांचा आरोपी पती नितीन धोंडीराम जांबळे याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता मालाड येथील कासमबाग, पावतीबाई मोरे चाळीत घडली.

कोमल आणि नितीन हे पती-पत्नी मालाड परिसरात राहत होते. या दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. कोमल हा एका खासगी कंपनीत तर नितीन हा एका बँकेत कामाला आहे. लग्नानंतर त्यांच्यात आर्थिक वाद सुरू होता. सतत होणाऱ्या वादानंतर ती तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. तिने पुन्हा घरी यावे यासाठी तो तिची मनधरणी करत होता. मात्र ती पुन्हा घरी येण्यास तयार नव्हती. रविवारी ते दोघेही कासमबाग, पावती बाई मोरे चाळीत भेटले होते. यावेळी त्याने तिला पुन्हा येण्याची विनंती केली. मात्र तिने घरी येण्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात त्याने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाल्याने ती जखमी झाली होती. ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपी पतीला अटक केली.

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

तुम्हीही रेल्वेने प्रवास करताय? मग 'हे' नवे नियम आधीच जाणून घ्या; सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य!