मुंबई

मुलुंडमध्ये महिलेची विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी; वृद्धाची आत्महत्या

मुलुंडमध्ये पार्किंगच्या भांडणादरम्यान महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याने वृद्धाने लोकलखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

मुंबई : मुलुंडमध्ये पार्किंगच्या भांडणादरम्यान महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याने वृद्धाने लोकलखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुशाल दंड (वय ६७) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मुलुंड पश्चिमेतील एका इमारतीमधील पार्किंगवरून कुमकुम मिश्रा आणि खुशाल दंड यांच्यात वाद झाला होता. यावेळी या महिलेने दंड यांना विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर खुशाल दंड प्रचंड अस्वस्थ झाले होते. याच तणावातून त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच कुमकुम मिश्राला अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे समजते.

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब

शक्तीपीठ महामार्गाला ६ तालुके ६१ गावांचा विरोध कायम; कोल्हापूरमधून जाणारा ११० किमी अंतराचा रस्ता वादामुळे रखडला