मुंबई

वरळी- शिवडी उन्नतमार्ग बाधितांसाठी उपाययोजना करणार - मुख्यमंत्री

प्रतिनिधी

“विकासकामे करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही. त्यामुळे वरळी-शिवडी उन्नतमार्ग प्रकल्प बाधितांच्या सर्व अडचणी समजून घेऊन, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यावर उपाययोजना केल्या जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, २४ रोजी स्थानिकांशी शिंदे संवाद साधताना सांगितले. वरळी-शिवडी उन्नतमार्ग प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रभादेवी परिसरातील कामगारनगर १ व २ आणि गणेशनगर या भागाची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर ते उपस्थित नागरिकांशी बोलत होते. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच प्रकल्प अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.

गेली काही वर्षे या रहिवाशांच्या संक्रमण शिबीर, घरांचे भाडे, पुनर्वसन आणि पुनर्विकास यांच्याशी निगडित अडचणी प्रलंबित आहेत. त्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने उपाययोजना केल्या जातील. झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रकल्प, योजना रेंगाळू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. यात केंद्र आणि राज्य मिळून पुनर्विकासाबात एकत्रित आणि समन्वयाने प्रयत्न करू. स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ उभे करू. - मुख्यमंत्री

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम