मुंबई

मुंबईत आज 'यलो अलर्ट'; रायगड, रत्नागिरीत 'ऑरेंज अलर्ट'

Swapnil S

मुंबई : राज्यात पावसाचा विस्तार होत असला, तरी गेल्या १७ दिवसांपासून वरुणराजा मुंबई व परिसराला हुलकावणी देत आहे. जोरदार पावसात मुंबई थांबली तर मुंबईत पाऊस पडला; मात्र रविवार ९ जून नंतर पावसाने मुंबईकडे पाठ फिरवल्याने मुंबईकरांना धो-धो पावसाचे वेध लागले आहेत.

आज गुरुवारी मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने मुंबईत 'यलो अलर्ट' जारी केले आहे, तर रायगड रत्नागिरीत 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आले आहे. तसेच कुडाळ, सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी व्यक्त केला.

यंदा पाऊस दोन दिवस आधीच म्हणजे ९ जून रोजी दाखल झाला. पहिल्याच दिवशी पाऊस जोरदार बरसत एन्ट्री केली. त्यानंतर जून संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही. अधूनमधून पावसाची हुलकावणी सुरू आहे. हवामान विभागाने हा आठवडा जोरदार पावसाचा असेल, असा इशारा दिला होता; मात्र जून संपत आला तरी जोर धार नाहीच, तर पुन्हा घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण आहेत. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत नंतर ब्रेक घेत असल्याने उकाडा सुरू होतो. हवामान विभागाने दिलेला अंदाज फोल ठरत आहेत.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था