संग्रहित छायाचित्र  एएनआय
मुंबई

योगेश कदम यांचे मंत्रिपद धोक्यात? ‘सावली’ डान्सबारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केल्याने अडचणीत वाढ

एकीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी केला. अनिल परब यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कदम यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Swapnil S

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाता जाता थोडक्यात बचावले. मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सावली डान्सबारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत दिल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सावली डान्सबार योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असल्याचे सगळे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. त्यामुळे योगेश कदम यांचे मंत्रिपदच धोक्यात येणार असल्याचे समजते.

पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. एकीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी केला. अनिल परब यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कदम यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. एखाद्याने चोरी केली आणि पकडल्यानंतर चोरीचा माल परत केला, म्हणजे तो गुन्ह्यातून सुटला असे नसते. योगेश कदम यांनी डान्सबारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केला म्हणजे डान्सबार बेकायदेशीर सुरू होता, हे सिद्ध होते, असे परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आधी म्हणाले होते की, फक्त ऑर्केस्ट्रा चालतो. ऑर्केस्ट्राच्या परवान्यावर डान्सबार चालवला गेला, त्याचा तपास सुरू आहे. याआधी देखील सावली बारवर कारवाई झाली आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव