मुंबई

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही; हसन मुश्रीफ

प्रतिनिधी

ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोनाकाळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत; मात्र आता या ऑनलाइन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्याना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास दोन लाख प्राथमिक शिक्षक असून, या प्रणालीमुळे कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली असून, सन २०२२मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुरुवारी मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का. गो. वळवी, पुणे जिल्हा परिषद सीईओ तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, पुणे स्मार्ट सीटीचे सीईओ संजय कोलते, जिल्हा परिषद सीईओ वर्धा सचिन ओंबासे, मुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभार, एमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डिले, त्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सर्व्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, नियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाइन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाइन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रियाच पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन न होता ऑनलाइनपद्धतीने होईल.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

भुयारी मेट्रोची दादर स्थानकापर्यंत चाचणी; पहिल्या टप्यातील मेट्रो धावण्याची तारीख लवकरच जाहीर होणार

चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी संपली,राज्यातील ११ मतदारसंघात सोमवारी मतदान