नवी दिल्ली : ऑडी, फोक्सवॅगन व स्कोडा कारच्या सुट्या भागांवर जाणुनबुजून कमी आयात कर भरून फोक्सवॅगन इंडियाने १२ हजार कोटी रुपयांची करचोरी केली आहे. याप्रकरणी कंपनीला भारत सरकारने नोटीस बजावली आहे.
सरकारने ३० सप्टेंबरला कंपनीला एक नोटीस जारी केली. त्यात फोक्सवॅगन जवळजवळ पूर्ण कार आयात करताना आढळली. भारतात १२ हजार कोटींची करचोरी
पूर्ण कार आयात केल्यास नियमानुसार, ३० ते ३५ टक्के कर लागतो. पण, कंपनीने सुटे भाग आयात केल्याचे दाखवून ५ ते १५ टक्के कर भरणा केला. फोक्सवॅगनची भारतीय कंपनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने सुपर्ब, कोडियाक, ऑडी ए ४, क्यू ५, फोक्सवॅगनची टिगुआन एसयूव्हीसाठी हेच प्रकार केले. ओळख लपवण्यासाठी कंपनीने वेगवेगळी आयात केली. त्यामुळे कंपनीला मोठा कर भरावा लागला नाही.
महाराष्ट्राच्या कस्टम विभागाची कंपनीला नोटीस
महाराष्ट्राच्या कस्टम विभागाने ९५ पानांची नोटीस कंपनीला बजावली आहे. मोठा आयात कर चुकवण्यासाठी कंपनीने हे डावपेच रचले. २०१२ पासून फोक्सवॅगनच्या भारतीय कंपनीला २.३५ अब्ज डॉलर आयात कर व अन्य कर भरायचे होते. मात्र, त्यांनी ९८१ दशलक्ष डॉलर भरले. १.३६ अब्ज डॉलर भरलेच नाहीत.