PTI
राष्ट्रीय

आसाममध्ये १५ पूरबळी, सहा लाख नागरिक प्रभावित

आसाममधील पूरस्थिती कायम असून १० जिल्ह्यांतील सहा लाखांहून अधिक लोक पाण्याखाली गेले आहेत. तर २८ मे पासून पूर आणि वादळात मरण पावलेल्यांची संख्या १५ वर गेली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती कायम असून १० जिल्ह्यांतील सहा लाखांहून अधिक लोक पाण्याखाली गेले आहेत. तर २८ मे पासून पूर आणि वादळात मरण पावलेल्यांची संख्या १५ वर गेली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक भागातील बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास भाग पाडले आहे. कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या. हैलाकांडी होजई, मोरीगाव, करीमगंज, नागाव, कचार, दिब्रुगढ, गोलाघाट, कार्बी आंगलाँग पश्चिम आणि दिमा हासाओ जिल्ह्यातील एकूण सहा लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. नागाव हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा राहिला आहे. त्यानंतर होजई आणि कचर यांचा क्रमांक लागतो. एकंदर ४० हजारांहून अधिक विस्थापित लोक विविध जिल्ह्यांतील मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि लोकांसह अनेक संस्थांद्वारे बचाव आणि मदत कार्य केले जात आहे. राज्यातील अनेक भागांतील रस्ते आणि रेल्वे दळणवळण विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यू हाफलांगच्या चंद्रनाथपूर सेक्शनमधील ट्रॅकचे नुकसान आणि लुमडिंग विभागातील सिलचर स्टेशनवर पाणी साचल्यामुळे, शनिवार ते सोमवारपर्यंत किमान १० गाड्या रद्द करण्यात आल्या, असे ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

Mumbai : मान्सूनच्या विलंबामुळे चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील साठा १३.५५ टक्क्यांवर

Thane : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे शिक्षकांची वानवा; २२२ तासिका तत्त्वावरील शिक्षकाचा भार

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

Mumbai : नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती वरळीतील कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू