राष्ट्रीय

तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

वृत्तसंस्था

भारतात तांदळाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के कर लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. सरकारने तांदळाच्या विविध दर्जानुसार, निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. प. बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या तांदुळ उत्पादक भागात यंदा पाऊस कमी झाला.त्यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तांदुळ निर्यातीवर कोणतेही प्रतिबंध लावण्याची योजना नाही, असे केंद्र सरकारने यापूर्वी सांगितले होते. सरकारकडे देशातील मागणीचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा बफर साठा आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसरा मोठा तांदुळ उत्पादक आहे. भारताने २०२१-२२ मध्ये २१.२ दशलक्ष टन तांदळाची निर्यात केली.

यंदा पाऊस कमी झाल्याने तांदळाची पेरणी ६ टक्क्याने घटून ३६७.५५ लाख हेक्टर झाली. झारखंड (१०.५१ लाख हेक्टर), प. बंगाल (४.६२ लाख हेक्टर), छत्तीसगड (३.४५ लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (२.६३ लाख हेक्टर) आणि बिहारमध्ये यंदा कमी पेरणी झाली. यापूर्वी केंद्र सरकारने गव्हावर निर्यातबंदी घातली होती.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण