राष्ट्रीय

थंडी सुरू झाल्याचा परिणाम; देशात वीज वापरात २.३ टक्के घट

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील वीज वापर डिसेंबरमध्ये किंचित म्हणजे २.३ टक्के घटून ११९.०७ अब्ज युनिट‌्स‌ (बीयू) झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार सौम्य हिवाळ्यामुळे विशेषत: उत्तरेकडील पाणी तापवण्याच्या उपकरणांचा वापर कमी झाल्याने वीज वापर कमी झाला आहे.

यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये वीज वापर १.५ टक्के घसरून १३० बीयू झाला असून मागील वर्षीच्या वरील महिन्यात १३२.०२ बीयू वापर झाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये वीज वापर १२१.९१ बीयू झाला होता, जो एका वर्षापूर्वी त्याच महिन्यात नोंदविलेल्या १०९.१७ बीयूपेक्षा जास्त आहे, अशी आकडेवारी सांगते. पीक पॉवर डिमांड अर्थात एका दिवसातील सर्वाधिक पुरवठा - यंदा डिसेंबरमध्ये २१३.६२ गिगावॉट इतका झाला होता. तर डिसेंबर २०२२ मध्ये सर्वाधिक वीजपुरवठा २०५.१० गिगावॉट आणि डिसेंबर २०२१ मध्ये १८९.२४ गिगावॉट झाला होता.

तज्ज्ञ म्हणाले की, डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात थंडी सौम्य असल्यामुळे वीज वापर कमी झाला. पर्यायाने मागणी कमी राहिली. तथापि, महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात उत्तर भारतातील उष्णता वाढल्याने वापर आणि मागणी वाढली. २९ डिसेंबर रोजी ‘पीक पॉवर’ची मागणी २१३.६२ गिगावॉट इतकी होती. तर ३ डिसेंबर रोजी हे प्रमाण १७४.१६ गिगावॉटपर्यंत कमी नोंदवली गेली. १४ डिसेंबर २०२३ रोजी २००.५६ गिगावॉट मागणी होती. ऊर्जा मंत्रालयाने उन्हाळ्यात २२९ गिगावॉट विजेची मागणी राहण्याचा अंदाज बांधला होता. मात्र, अवकाळी पावसामुळे एप्रिल-जुलैमध्ये ही मागणी अंदाजित पातळीवर पोहोचली नाही.

जुलैमध्ये २०९.०३ गिगावॉटपर्यंत मागणी कमी होण्यापूर्वी जूनमध्ये २२४.१ गिगावॉट सर्वाधिक वीजपुरवठा झाला होता. तर सर्वाधिक मागणी ऑगस्टमध्ये २३८.८२ गिगावॉट इतकी राहिली. सप्टेंबर २०२३ मध्ये मागणी तब्बल २४३.२७ गिगावॉट होती. ऑक्टोबरमध्ये मागणीचे प्रमाण २२२.१६ गिगावॉट आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये २०४.८६ गिगावॉट होती.

मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे वीज वापरावर परिणाम झाला. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुख्यतः दमट हवामान परिस्थितीमुळे आणि उत्सवाच्या हंगामाच्या अगोदर औद्योगिक कारखान्यांमध्येही वीज वापर वाढला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त