राष्ट्रीय

भारताला जपानचे नऊ प्रकल्पांसाठी २३२ अब्ज जपानी येनचे कर्ज

भारत आणि जपानचा १९५८ पासून द्विपक्षीय विकास सहकार्याचा दीर्घ आणि फलदायी इतिहास आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जपान सरकार भारतातील विविध क्षेत्रामधील नऊ प्रकल्पांसाठी २३२.२०९ अब्ज जपानी येन अधिकृत विकास सहाय्य कर्ज म्हणून देणार आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव विकास शील आणि जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्यात याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता झाली.

अधिकृत विकास सहाय्य कर्ज मिळणारे प्रकल्प खालीलप्रमाणे

ईशान्य रस्ते नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारणा प्रकल्प (टप्पा ३) (भाग II): धुबरी-फुलबारी पूल (जेपीवाय ३४.५४ अब्ज), ईशान्य रस्ते नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारणा प्रकल्प (टप्पा ७): एनएच १२७ बी (फुलबारी-गोराग्रे विभाग) (जेपीवाय १५.५६ अब्ज), तेलंगणामध्ये स्टार्ट-अप आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी प्रकल्प (जेपीवाय २३.७ अब्ज), चेन्नई परिघीय रिंग रोड (टप्पा २) च्या बांधकामाचा प्रकल्प (४९.८५ अब्ज जेपीवाय) तर हरयाणामध्ये शाश्वत फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प (पहिला भाग) (जेपीवाय १६.२१ अब्ज), राजस्थानमधील हवामान बदल प्रतिसाद आणि परिसंस्था सेवा प्रोत्साहन प्रकल्प (जेपीवाय २६.१३ अब्ज), कोहिमामधील नागालँड वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या स्थापनेसाठी प्रकल्प (जेपीवाय १० अब्ज), उत्तराखंडमधील शहरी पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुधारणेसाठी प्रकल्प (जेपीवाय १६.२१ अब्ज); आणि समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर प्रकल्प (टप्पा १) (पाचवा भाग (जेपीवाय ४० अब्ज) मिळणार आहेत. भारत आणि जपानचा १९५८ पासून द्विपक्षीय विकास सहकार्याचा दीर्घ आणि फलदायी इतिहास आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा