राष्ट्रीय

४७ माजी न्यायाधीश पदसिद्ध वरिष्ठ वकील

हरियाणा हायकोर्टातील जयश्री ठाकूर यांनाही वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या ४७ माजी न्यायाधीशांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले आहे. यात मुंबई हायकोर्टाचे रमेश देवकीनंदन धानुका, ओरिसा उच्च न्यायालयाचे डॉ. एस. मुरलीधर, राजस्थानचे सतीश कुमार मित्तल, गुजरातच्या सोनिया गोकानी, बदर दुरेझ अहमद आणि जम्मू-काश्मीरचे महेश कुमार मित्तल यांचा समावेश आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सात माजी न्यायाधीश संदीप काशिनाथ शिंदे, वडाने कालिदास, साधना एस. जाधव, विनय देशपांडे, सत्यरंजन सी. धर्माधिकारी, तानाजी विश्वास नलावडे आणि अभय महादेव ठिपसे यांचा यात समावेश आहे. मोहिंदर मोहन सिंग बेदी, गुरमित राम, अशोक कुमार वर्मा, तेजिंदर सिंग धिंडसा, महिंदर सिंग सुल्लर आणि पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातील जयश्री ठाकूर यांनाही वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश