ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवा सुपर फास्ट होणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन होणार आहे. याचा भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालानुसार, 5G मुळे 2023 ते 2040 दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला 36.4 ट्रिलियन रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे.
12 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होईल
5G स्पेक्ट्रमचा लिलाव ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 12 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे.