पीटीआय
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत किमान सात नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Swapnil S

नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत किमान सात नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी अभुजमाद जंगलात पहाटे नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना मिळाले. या परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव दलाचे कर्मचारीही मोहिमेत सहभागी झाले होते.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती