National Film Awards 2026 : ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला 
राष्ट्रीय

National Film Awards 2026 : ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात यावेळी बदल होणार आहे. ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच नवी दिल्लीबाहेर होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यासाठी गुजरातच्या एकता नगरची (केवडिया) निवड करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात यावेळी बदल होणार आहे. ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच नवी दिल्लीबाहेर होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यासाठी गुजरातच्या एकता नगरची (केवडिया) निवड करण्यात आली आहे. येथे जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थित आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २३ सप्टेंबरच्या गुजरात दौऱ्यादरम्यान पुरस्कार प्रदान केले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सामान्यतः नवी दिल्लीत होत असे. गेल्या वर्षी ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा २३ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले होते.आता ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी परंपरेत बदल केला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जरांगेंची मोर्चेबांधणी; १२ सप्टेंबरला मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन, पोलीस कारवाई झाल्यास '१० मिनिटांत महाराष्ट्र बंद'

जात प्रमाणपत्रांचा वाद : ७९ प्रकरणे न्यायालयात; ठाकरेंचे २४, तर भाजपचे १६ नगरसेवक अडचणीत

MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा आक्रोश! सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

MPSC Paper Leak : ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; भीमनवार यांचे प्रत्युत्तर

धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी; सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट