पीटीआय
राष्ट्रीय

मणिपूरमधील मंत्र्याच्या घराबाहेर काटेरी कुंपण

गेल्या पावणेदोन वर्षांपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. मणिपुरात १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री बीरेन सिंह व १७ आमदारांवर हल्ले झाले. यात मंत्री एल. सुसींद्रो यांच्या घरावर हल्ला झाला होता.

Swapnil S

इम्फाळ : गेल्या पावणेदोन वर्षांपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. मणिपुरात १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री बीरेन सिंह व १७ आमदारांवर हल्ले झाले. यात मंत्री एल. सुसींद्रो यांच्या घरावर हल्ला झाला होता. आता सुसींद्रो यांनी मणिपूर ईस्ट येथील आपल्या घराबाहेर काटेरी तारांचे कुंपण केले आहे. सुसींद्रो म्हणाले की, संपत्तीचे संरक्षण करणे हा आमचा संवैधानिक हक्क आहे. जमावाने पुन्हा असे केल्यास त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल. मणिपूरमध्ये सुसींद्रो हे चर्चेतील मंत्री आहेत. जेव्हा मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रांची लूट सुरू होती तेव्हा त्यांनी आपल्या घरात शस्त्रास्त्रांचा बॉक्स ठेवला होता. कारण लोकांनी आपली शस्त्रास्त्रे त्यात टाकावीत.

सुसींद्रो हे मैतेई समाजातून येतात

आमदारांच्या घरी हल्ल्याच्यावेळी १.५ कोटी रुपयांचे दागिने लुटले गेले. जदयू आमदार के. जॉयकिशन सिंह यांच्या आईने पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. संतप्त जमावाने थांगमेइबंद भागात आमदाराच्या घरातून १८ लाख रुपये रोख पळवली. तसेच विस्थापितांसाठी ठेवलेले सामान नष्ट केले.

शरणार्थी शिबिरातील स्वयंसेवक सनयाईने सांगितले की, हिंसेच्या काळात लॉकर, इलेक्ट्रॉनिक्स सामान व फर्निचरची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाने ७ गॅस सिलिंडर चोरले. शरणार्थींची कागदपत्रे नष्ट केली. तीन एसी यंत्र नेण्याचा प्रयत्न केला.

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव