राष्ट्रीय

पाकव्याप्त भारताच्या बाबतीत भारतीय लष्कराचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मोठे वक्तव्य

गोंधळलेले दहशतवादी कधी पिस्तूल, कधी शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न करतात. निरपराध लोकांना लक्ष्य केले जात आहे. पण...

वृत्तसंस्था

भारतीय लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे वक्तव्य केले. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यात मोठा बदल झाला आहे. राज्यात दहशतवादाला आळा बसला आहे. उपेंद्र द्विवेदी म्हणाले, "जेव्हाही भारत सरकार आदेश देईल तेव्हा लष्कर पीओकेमध्ये कारवाई करण्यास तयार आहे."

“दहशतवाद्यांचे इरादे कधीच यशस्वी होणार नाहीत. पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेने ठराव मंजूर केला आहे. यात नवीन काहीच नाही. तो संसदेच्या प्रस्तावाचा भाग आहे. सरकारच्या कोणत्याही आदेशाचे पालन करण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. जेव्हा सरकार आदेश देईल तेव्हा लष्कर पूर्ण तयारीने पुढे जाईल,” लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद रोखण्यासाठी बरेच काम करण्यात आले, त्यामुळे गोंधळलेले दहशतवादी कधी पिस्तूल, कधी शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न करतात. निरपराध लोकांना लक्ष्य केले जात आहे. पण दहशतवादी त्यांच्या हेतूत कधीही यशस्वी होणार नाहीत, असे टार्गेट किलिंगवर लेफ्टनंट यांनी आपले मत मांडले.

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?

भांडण सोडवल्याची 'शिक्षा'; ४५ दिवस तुरूंगवास भोगल्याचा दावा, म्हणाला - “मैं सेंट्रल जेल से गोरा होकर आया”! तरुणाचा VIDEO व्हायरल

महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...

Thane : घोडबंदर घाटात उतरणीवर कंटेनरच्या धडकेमुळे विचित्र अपघात; अनेक वाहने एकमेकांवर आदळली, चालक फरार - Video

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर