राष्ट्रीय

सात वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून खून

मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे

Swapnil S

इटावा : उत्तर प्रदेशातील देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी तिचा मृतदेह एका शेतातून बाहेर काढला, तर तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, मारण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ अधीक्षक (एसएसपी) राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे, असे सिंग यांनी सांगितले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मुलगी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिच्या मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी बाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. श्वान पथकाच्या मदतीने मुलीचा शोध सुरू केला तेव्हा पोलिसांनी रविवारी गावाजवळील मोहरीच्या शेतातून मुलीचा मृतदेह बाहेर काढला, असे त्यांनी सांगितले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव