राष्ट्रीय

चिनी मोबाइल विवोवर कारवाई, भारतातल्या कार्यालयांवर ईडीची छापेमारी

या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग अर्थात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे

वृत्तसंस्था

एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट अर्थात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विवो या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीच्या भारतातल्या ठिकठिकाणच्या कार्यालयांवर छापे टाकले. मंगळवारी विवोच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि काही दाक्षिणात्य राज्यांतील अशा एकूण ४०कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले. या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग अर्थात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भातील तपासासाठी हे छापे टाकण्यात आल्याचे समजते.

'विवो'च्या नेमक्या कोणत्या संभाव्य गुन्ह्यामुळे 'ईडी'ने हा तपास सुरू केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र २०२० मध्ये मेरठ पोलिसांनी विवो कंपनीविरोधात फसवणुकीचा एक खटला दाखल केला होता. एकाच IMEI नंबरचे जवळपास १३ हजार ५०० फोन्स देशात वितरित केल्याचा आरोप विवो कंपनीवर ठेवण्यात आला होता. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी अर्थात IMEI हा १५ आकडी नंबर प्रत्येक स्मार्टफोनला असतो आणि तो युनिक अर्थात एकमेवाद्वितीय असतो. थोडक्यात, प्रत्येक स्मार्टफोनचा IMEI वेगळा असतो. तसा तो नसल्यास ३ वर्षांच्या तुरुंगवासापर्यंतची शिक्षा मिळू शकते, असे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटीने (ट्राय) २०१७ साली जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने 'ईडी'ने आता छापे टाकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'ईडी'ने खटला दाखल केलेली विवो ही दुसरी मोठी चिनी कंपनी ठरली आहे. याआधी शाओमी या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीवर 'ईडी'ने खटला दाखल केला होता. अवैध आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार करून फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्टचं (फेमा) उल्लंघन केल्याचा आरोप त्या कंपनीवर ठेवण्यात आला होता.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत