राष्ट्रीय

अभिनेता मन्सूर अली खानने माफी मागावी अभिनेत्री तृषा कृष्णनवर अश्लिल टिप्पणी

सोशल मीडियावर तसेच महिलांविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल खान याच्यावर चीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे.

नवशक्ती Web Desk

चेन्नई : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील द साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन (नडिगर संगम) या संघटनेने अभिनेता मन्सूर अली खान याने अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्यावर केलेल्या अश्लिल विधानाबाबत, तिची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

तृषा तसेच खुशबू आणि रोजा या अन्य दोन अभिनेत्रींवरही त्याने अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. त्याबद्दलही त्याने माफी मागावी, असे सांगत खान याचे संघटनेचे सदस्यत्व रद्द करावे लागेल, असाही इशारा देण्यात आला आहे. द साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अभिनेते एम. नसीर यांनी याबद्दल ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खुशबू आणि रोजा यांच्यावरही खान याने तृषावर वक्तव्य करण्यापूर्वी वक्तव्य केले होते. त्यांचीही त्याने मापी मागायला हवी. पत्रकारांशी बोलताना नासीर यांनी ही मागणी केली.

विनोदाच्या नावाखाली त्याने केलेली हे वक्तव्ये अनादर करणारी आणि धक्कादायक असून ते अश्लिल आहे. तृषा कृष्णनने एक्सवर आपली निषेध करणारी पोस्ट प्रसिद्ध केली आहे. तृषाच्या व्यथा पुन्हा पोस्ट करताना प्रसिद्ध अभिनेत्री व भाजप कार्यकर्त्या खुशबू सुंदर, यांनी पोस्टवर म्हटले आहे की, संघटनेबरोबर मी संघटनेची सदस्य म्हणून, मन्सूर अली खानचा मुद्दा माझ्या वरिष्ठांसोबत आधीच मांडला आहे आणि त्यावर कारवाई करणार आहे. अशा घाणेरड्या मनापासून दूर जा. जिथे हा माणूस माझ्यासह त्यांच्याबद्दल अशा लैंगिक घृणास्पद मानसिकतेने बोलतो. जेव्हा आपण महिलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी दात आणि नखे लढत असतात. खानची निंदा करताना, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक लोकेश कनगराज यांनी सांगितले की, अशा वक्तव्यांमुळे आपण निराश आणि संतप्त होतो. 'लिओ' हा कनागराज दिग्दर्शित आहे.

सोशल मीडियावर तसेच महिलांविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल खान याच्यावर चीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. तर या संबंधात त्याने केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी नेहमीच अभिनेत्रींचा आदर केला आहे आणि त्यांच्या टिप्पणीच्या 'विकृत' अर्थ काढला गेला आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी