राष्ट्रीय

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, खंडणी प्रकरणी आरोपपत्र दाखल

52 लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किमतीच्या 4 पर्शियन मांजरींचा समावेश एकूण 36 लाख रुपये

वृत्तसंस्था

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर 215 कोटींच्या खंडणी प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर खंडणी वसूल करणार असल्याची माहिती होती. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

जॅकलीन फर्नांडिस 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी असल्याचे ईडीने म्हटले आहे. जॅकलिनची ईडीने केली चौकशी जॅकलिन फर्नांडिसची ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव पुढे आले आहे. सुकेशकडून महागडे प्राणी भेटवस्तू घेणे महाग पडण्याची शक्यता आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला करोडोंची भेट दिली, जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना 5 तारखेला ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला मुंबई विमानतळावर अडवले. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडी जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करत आहे. सुकेश चंद्रशेखर या व्यावसायिकाने जॅकलीनला एकूण 5 प्राणी भेट म्हणून दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 52 लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किमतीच्या 4 पर्शियन मांजरींचा समावेश एकूण 36 लाख रुपये आहे. जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोही समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता.

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Mumbai : प्रवासी दोन लाख, पैसे मात्र ३० लाखांच्या हिशेबाने; 'चलो ॲप'च्या व्यवहारांच्या चौकशीची मागणी

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Mumbai : 'बेस्ट कॅन्टीन', 'इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस'चे परवाने निलंबित

Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत