राष्ट्रीय

कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोटींची भर,टाटा कन्सलटंसीला सर्वाधिक लाभ

वृत्तसंस्था

गेल्या आठवड्यात झालेल्या शेअर बाजारातील व्यवहारात आघाडीच्या दहा पैकी नऊ कंपन्यांच्या बाजारमूल्यात २.५१ लाख कोटींची भर पडली आहे. त्याचा सर्वाधिक लाभ टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसला झाला. गेल्या आठवड्यात ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १३६७ अंकांनी किंवा २.६६ टक्के उसळला.

टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या बाजारमूल्यात ७४,५३४.८७ कोटींची भर पडून १२,०४,९०७.३२ कोटी झाले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे ४४,८८८.९५ कोटींनी वाढून ५,४१,२४०. १० कोटी, एचडीएफसी बँकेचे ३५,४२७.१८ कोटींनी वाढून ७,५१,८००.३१ कोटी तर एचडीएफसीचे २४,७४७.८७ कोटींनी भर पडून ३,९७,१९०.५० कोटी झाले.

इन्फोसिसचे मूल्य २२,८८८.४९ कोटींनी वधारुन ६,०६,७३४.५० कोटी, आयसीआयसीआय बँकेचे १७,८१३.७८ कोटींनी वाढून ४,९६,३५४.३६ कोटी, भारती एअरटेलचे १५,१८५.४५ कोटींनी भर पडत ३,६८,७८९.६३ कोटी झाले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ११,९१४.३६ कोटींनी वाढून ४,०५,४८९.७३ कोटी तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी)मध्ये ४,४२७.५ कोटींची भर पडत ४,१८,५२५.१० कोटी रुपये झाले.

तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य ५९,९०१.०७ कोटींनी घसरुन १६,९१,७८५.४५ कोटी झाले. क्रमवारीत रिलायन्सचे अव्वल स्थान कायम असून त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर,आयसीआयसीआय बँक, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम