प्रातिनिधिक छायाचित्र 
राष्ट्रीय

लठ्ठपणा, मधुमेह नियंत्रित करणारी औषधे स्वस्त

देशात सध्या लठ्ठपणा व 'टाईप-२' मधुमेह ही मोठी समस्या आहे. या आजाराची औषधे महाग असल्याने अनेकांना किमती ऐकूनच भोवळ यायला लागते.

Swapnil S

नवी दिल्ली: देशात सध्या लठ्ठपणा व 'टाईप-२' मधुमेह ही मोठी समस्या आहे. या आजाराची औषधे महाग असल्याने अनेकांना किमती ऐकूनच भोवळ यायला लागते. आता अल्केम लॅबोरेटरीजने या आजारावरील गुणकारी स्वस्तातील सेमाग्लुटाइड इंजेक्शन्स बाजारात आणली आहेत. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लठ्ठपणा आणि मधुमेह हे सामान्य आजार झाले आहेत, परंतु उपचार अनेकदा महाग असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या औषधांसाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात.

अल्केम लॅबोरेटरीजने मधुमेह आणि वजन कमी करण्याच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. कंपनीने सेमाग्लुटाइड इंजेक्शन्स बाजारात आणली आहेत. ज्याची किंमत प्रति साप्ताहिक डोस ४५० रुपये आहे. म्हणजेच दरमहा या आजारांसाठी १८०० रुपये खर्च करावा लागेल.

ही औषधे 'सेमासाईज', 'ओबेसेमा' आणि 'हेपाग्लाईड' या ब्रँड नावांनी विकली जातील. कंपनीने एक प्री-फिल्ड डिस्पोजेबल इंडक्शन पेन सादर केले. एका महिन्याच्या डोसची किंमत ₹१,८०० असेल, म्हणजेच प्रति आठवडा ४५० रुपये. सध्याच्या दाव्यांच्या तुलनेत ही ५० ते ९० टक्के कपात आहे. सेमाग्लुटाइड इंजेक्शन्स फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावीत, असे कंपनीने नमूद केले.

प्रत्येक वेळी किट खरेदी करण्याची गरज नाही

अल्केम लॅबोरेटरीजने सांगितले की, जास्त डोसची आवश्यकता असल्यास पुन्हा वापरता येणारे इंडक्शन पेन दिले जातील. यामुळे रुग्णांना प्रत्येक वेळी नवीन उपकरण खरेदी करण्याऐवजी फक्त कार्टिज बदलावी लागेल. यामुळे रुग्णांचा खर्च कमी होईल. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांचा आढावा पूर्ण केला आहे. त्यानंतर औषध नियंत्रण महासंचालकांनी भारतात सेमाग्लुटाइडचे उत्पादन आणि विक्री करण्यास मंजुरी दिली आहे.

अल्केम लॅबोरेटरीज मुख्य कार्यकारी अधिकारी विकास गुप्ता यांनी सांगितले की, हे औषध वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कारण जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकेल.

विविध कंपन्यांची उत्पादने दाखल

सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि ग्लेनमार्क, देशातील आघाडीच्या औषध कंपन्यांनी शनिवारी मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सेमाग्लुटाइड इंजेक्शनच्या जेनेरिक आवृत्त्या बाजारात आणण्याची घोषणा केली. ओझेम्पिक आणि वेगोवीसारख्या औषधांमधील मूळ घटकाचे पेटंट भारतात कालबाह्य झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सन फार्माने 'नोव्हेलट्रीट' आणि 'सेमाट्रिनिटी' या ब्रँड नावांनी आपले सेमाग्लुटाइड इंजेक्शन सर्व डोसेसमध्ये सादर केले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, नोव्हेलट्रीटचा साप्ताहिक खर्च अंदाजे ९०० ते २००० पर्यंत आहे, तर सेमाट्रिनिटीचा खर्च ७५० ते १३०० रुपयांपर्यंत आहे.

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

लातूर बँकेच्या संचालकांना हटवण्याचे RBI चे आदेश

Ulhasnagar : विजेच्या धक्क्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कपड्यांचा घोळ; BCCI ची जर्सी घालून मैदानात उतरणार