Photo : X
राष्ट्रीय

‘अग्नि -५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नि-५’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी ओदिशामध्ये करण्यात आली. ‘अग्नि -५’ हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे.

Swapnil S

चांदीपूर : जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नि-५’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी ओदिशामध्ये करण्यात आली. ‘अग्नि -५’ हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे.

ओदिशाच्या चांदीपूरमध्ये ‘इंटीग्रेटेड टेस्ट रेंज’ येथून मध्ये बॅलेस्टिक मिसाइल ‘अग्नि-५’चे यशस्वी परीक्षण करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षणात सर्व संचालन आणि तंत्रज्ञानाच्या मानकांची नोंदणी झाली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीत करण्यात आली. ‘अग्नि -५’ या मिसाइलची मारक क्षमता ५ हजार किमीपेक्षा अधिक आहे. मिसाइलमध्ये ‘मल्टिपल इंडिपेंडेंटी टार्गेटेबल री-एंट्री व्हेहिकल्स’ तंत्रज्ञानाचा समावेश आहे. म्हणजे हे क्षेपणास्त्र एकदा लाँच केल्यानंतर अनेक टार्गेटवर हल्ला करु शकते. ‘अग्नि-५’मध्ये दीड टनांपर्यंत अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे.

वेग ‘मॅक २४’ इतका

‘अग्नि -५’चा वेग ‘मॅक २४’ आहे. या क्षेपणास्त्राची लाँचिंग यंत्रणा कॅनिस्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. या कारणामुळे याची वाहतूक करणेही सोपे आहे. सध्या भारताशिवाय केवळ आठ देशांकडे इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल आहे. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्त्रायल, ब्रिटन आणि कोरियाचा त्यामध्ये समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी बुधवार २० ऑगस्ट रोजी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडअंतर्गत करण्यात आली. या क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष पूर्ण केले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, ही चाचणी नियमित प्रक्रियेचा एक भाग आहे, जेणेकरून सिस्टम तयार ठेवता येईल आणि गरज पडल्यास सिस्टम वेगात तैनात आणि सक्रिय करता येईल.

पाकिस्तान चिंतेत

भारताने केलेल्या ‘अग्नि ५’च्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाकिस्तानस्थित थिंक टँक असलेल्या ‘स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूट’ने पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना इशारा दिला आहे की, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पाकिस्तानसाठी “गंभीर धोका” आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदार ED च्या रडारवर! के.सी. वीरेंद्र सिक्कीममधून अटकेत; गोव्यात पाच कॅसिनो अन् कोट्यवधी रुपयांची उलाढाल

धक्कादायक! मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी CBI चा छापा; १७ हजार कोटींच्या बँक फसवणुकीची चौकशी

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

OBC त २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली; राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रस्ताव; केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय