ड्रोन ‘अग्निवेग’ लष्करात दाखल (Photo-X)
राष्ट्रीय

Peacekeeper Agniveg : ड्रोन ‘अग्निवेग’ लष्करात दाखल

वेगवान, अचूक मारा करणाऱ्या इराणी ड्रोनने अमेरिकेची युद्धात पळता भुई थोडी केली. स्वस्तात बनलेल्या ड्रोनने अमेरिकेच्या आधुनिक यंत्रणांना चकमा दिला किंवा त्यांचे मोठे नुकसान केले.

Swapnil S

नवी दिल्ली : वेगवान, अचूक मारा करणाऱ्या इराणी ड्रोनने अमेरिकेची युद्धात पळता भुई थोडी केली. स्वस्तात बनलेल्या ड्रोनने अमेरिकेच्या आधुनिक यंत्रणांना चकमा दिला किंवा त्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे भारतानेही आपल्या भात्यात आत्मघातकी ‘अग्निवेग’ हे ड्रोन दाखल केले आहेत. शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी आणि विद्युत-चुंबकीय वातावरणात काम करण्यासाठी हे ड्रोन विकसित करण्यात आले आहेत.

हे ड्रोन संरक्षण तंत्रज्ञान कंपनी ‘एसएमपीपी’ने सांगितले की, १८० किमीपर्यंत मारक क्षमता आणि ताशी ४५० किमीपर्यंतचा वेग असलेले हे ड्रोन अत्यंत महत्त्वाचे आहेत. ‘अग्निवेग’ हे ड्रोन लष्कराच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, रसद केंद्रे , कमांड सेंटर्स, रडार आणि इतर धोरणात्मक ठिकाणांवर स्वतःहून अचूक हल्ला करण्यास सक्षम आहेत.

‘एसएमपीपी’ने लष्कराला १०६ स्वदेशी कामिकेझ ड्रोनची डिलिव्हरी पूर्ण केली आहे. भारताच्या वाढत्या मानवरहित युद्ध क्षमतेमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही प्रणाली भारतीय लष्कराला संवेदनशील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि किफायतशीर पर्याय देते. तसेच, हे ड्रोन लष्करी जवानांसाठीचा धोकाही कमी करतात.

बँका येत्या रविवारीही राहणार सुरू; अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय

'सुपर एल निनो'मुळे साडेचार लाख लोकांना मृत्यूचा धोका; जगभरात भारतासह आशियाई देशांना तीव्र उष्णतेचा बसणार फटका

Mumbai : एसी, प्रथम श्रेणी पास महागणार! दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर ५.९० रुपये अतिरिक्त शुल्क लागू होणार

भाजपने भाकरी फिरवली, संघटनेत खांदेपालट

Mumbai : वीजबिल थकबाकीदारांना 'बेस्ट दिलासा'; अभय योजनेला मंजुरी, सोळा हजार ग्राहकांना होणार लाभ