राष्ट्रीय

अहमदाबाद विमान दुर्घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’; पियूष गोयल यांचे वादग्रस्त वक्तव्य

अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला त्याबद्दल केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ‘अपघाताची घटना खूप दुर्दैवी आहे. ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ आहे आणि हा एक अपघात आहे असे दिसते. असे वक्तव्य गोयल यांनी लंडनमधील ‘क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर’ येथे ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना केले.

Swapnil S

लंडन : अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला त्याबद्दल केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ‘अपघाताची घटना खूप दुर्दैवी आहे. ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ आहे आणि हा एक अपघात आहे असे दिसते. भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत’, असे वक्तव्य गोयल यांनी लंडनमधील ‘क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर’ येथे ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना केले.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. अपघात झाला तेव्हा विमानात २३० प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते. यातील एक प्रवासी वगळता इतर सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. यासोबतच हे विमान ज्या इमारतीवर कोसळले होते तेथील काहींचाही यामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची सध्या चौकशी सुरू आहे, परंतु भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत. ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ आहे, अपघाताची चौकशी सुरू आहे, असे गोयल म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्याची सध्या सर्व स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे.

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

"कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल"; आधी टॅरिफचा तडाखा, आता ट्रम्प यांना पाकचा पुळका; भारताला थेट डिवचलं

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य