'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

AI मुळे जाहिराती क्षेत्रात संधी; महागड्या माध्यमांवर जाहिरात करणे उद्योगांना शक्य

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांना जाहिरातींच्या अशा नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत, ज्या पूर्वी त्यांच्या आवाक्याबाहेर वाटत होत्या, असे ‘ॲमेझॉन ॲड्स’च्या ताज्या अभ्यासातून समोर आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांना जाहिरातींच्या अशा नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत, ज्या पूर्वी त्यांच्या आवाक्याबाहेर वाटत होत्या, असे ‘ॲमेझॉन ॲड्स’च्या ताज्या अभ्यासातून समोर आले आहे.

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, ७५% भारतीय लहान उद्योजकांनी मान्य केले की एआय आधारित जाहिरातींमुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली आहे. तसेच, ६८% उद्योजकांच्या मते या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या मार्केटिंगमध्ये अधिक कल्पकता आणि नवनिर्मिती आणणे शक्य झाले आहे.

ॲमेझॉन ॲड्स इंडियाचे संचालक कपिल शर्मा म्हणाले, भारतीय लहान व्यावसायिक आता पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने जाहिरात क्षेत्राकडे पाहत आहेत. भारतात AI टूल्स वापरणाऱ्या ॲमेझॉन जाहिरातदारांची संख्या वर्षभरात ७७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत या टूल्सच्या मदतीने लहान उद्योजकांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत ६२% अधिक जाहिराती तयार केल्या आहेत.

पूर्वी स्ट्रिमिंग टीव्हीसारखी माध्यमे केवळ मोठ्या बजेट असणाऱ्या ब्रँड्ससाठीच राखीव मानली जायची. मात्र, आज एआयमुळे लहान उद्योगांनाही या वाहिन्यांचा वापर करणे सहज शक्य झाले आहे, असे कपिल शर्मा, संचालक, ॲमेझॉन ॲड्स इंडिया यांनी सांगितले.

नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे

३ वर्षांपूर्वी जास्त खर्च (४८%), किमान खर्चाची अट (३९%) आणि नियोजनातील गुंतागुंत (३६%) यामुळे लहान उद्योग स्ट्रिमिंग टीव्हीपासून दूर राहत होते. आज ६२% उद्योजकांना वाटते की या माध्यमातून नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी