एअर इंडियाचे विमान आले अचानक ३०० फूट खाली; १५ जण जखमी 
राष्ट्रीय

एअर इंडियाचे विमान आले अचानक ३०० फूट खाली; १५ जण जखमी

फुकेतवरून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी सकाळी हवेत तीव्र टर्ब्युलन्सचा (वेग, दाब, दिशाबदल) सामना करावा लागला.

Swapnil S

नवी दिल्ली : फुकेतवरून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी सकाळी हवेत तीव्र टर्ब्युलन्सचा (वेग, दाब, दिशाबदल) सामना करावा लागला. या दरम्यान विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आले. या घटनेत विमानातील १५ जण जखमी झाले असून, यामध्ये एका केबिन क्रू सदस्याला गंभीर दुखापत झाली आहे.

फुकेतवरून उड्डाण केलेले ‘एआय २३७९’ हे ए-३२० नॅरो-बॉडी विमान सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या विमानात १३४ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्ससह एकूण १४२ जण प्रवास करत होते.

नागरी उड्डाण महासंचालनालयाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या १५ जणांमध्ये ११ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे. प्राथमिक उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे 'व्हीटी-ईएक्सओ' नोंदणीकृत विमान हवेत उडत असताना अचानक ३०० फूट खाली आले. विमानाच्या पायलट-इन-कमांडने एका केबिन क्रू सदस्याला गंभीर दुखापत झाल्याची तर इतरांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सायबर फसवणुकीला चाप; सर्वोच्च न्यायालय सरसावले, बनावट बँक खात्यांविरोधात ‘एसओपी’ जारी करण्याचे RBI ला आदेश

‘थर्ड-पार्टी विमा नाही, तर इंधन नाही’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

८४७ कांदळवनांवर कुऱ्हाड; उच्च न्यायालयाने ‘बुलेट ट्रेन’साठी दिली तोडण्यास परवानगी

Mumbai : जुहू येथील इमारती, झोपड्यांना दिलासा; तब्बल ७५ वर्षांनंतर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास