राष्ट्रीय

दिवाळखोर गो फर्स्टसाठी अजय सिंग आणि बिझी बी एअरवेजची बोली

Swapnil S

नवी दिल्ली : स्पाइसजेटचे प्रमुख अजय सिंग आणि बिझी बी एअरवेजने दिवाळखोर गो फर्स्टसाठी बोली सादर केली आहे. सिंग यांनी बिझी बी एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड सोबत त्यांच्या वैयक्तिक क्षमतेने ही बोली सादर केली आहे, असे स्पाइसजेटने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नवीन एअरलाईनसाठी ऑपरेटिंग पार्टनर म्हणून स्पाइसजेटच्या भूमिकेत आवश्यक कर्मचारी, सेवा आणि उद्योग कौशल्य प्रदान करणे यांचा समावेश असणार आहे. या सहकार्यामुळे दोन विमान कंपन्यांमध्ये समन्वय निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय विमान वाहतूक उद्योगात सुधारित खर्च व्यवस्थापन, महसूल वाढ आणि बाजारपेठेत मजबूत स्थिती निर्माण होईल, असे निवदेनात म्हटले आहे.

स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सिंग म्हणाले की, गो फर्स्टमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि स्पाइसजेटशी जवळीक साधून काम करण्यासाठी पुनरुज्जीवित केले जाऊ शकते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे दोन्ही विमान कंपन्यांना फायदा होईल.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रतिष्ठित स्लॉट, आंतरराष्ट्रीय वाहतूक अधिकार आणि १०० हून अधिक एअरबस निओ विमानांची ऑर्डर याशिवाय गो फर्स्ट हा विमान कंपन्यांमध्ये एक विश्वासार्ह आणि मौल्यवान ब्रँड आहे. या लोकप्रिय एअरलाईनला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देताना मला आनंद होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल