राष्ट्रीय

झिम्बाब्वेविरुद्धच्या वन-डे मालिकेत फिटनेससोबतच राहुलच्या नेतृत्त्वाचाही कस लागणार

पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि के एल राहुल सलामीला खेळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वृत्तसंस्था

हरारे येथे गुरुवारपासून भारत, झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत के एल राहुलवर कर्णधाराची धुरा असल्याने फिटनेसबरोबरच त्याच्या नेतृत्त्वाचाही कस लागणार आहे.

पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि के एल राहुल सलामीला खेळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिखर धवनकडे उपकर्णधारपद आल्याने त्याला फलंदाजीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यास वाव आहे. दोघेही सलामीला सक्षम असल्याने तिसऱ्या फलंदाजाची सलामीसाठी विचार होण्याची शक्यता धुसर आहे. मधल्या फळीत युवा खेळाडूंसाठी स्वत:ला सिध्द करण्याची संधी असेल.

शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. शुभमनने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्याचबरोबर इशान किशन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. दीपक हुडा आणि राहुल त्रिपाठी यांनाही संधी मिळण्याचे संकेत आहेत. कुलदीप यादवकडे प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीची धुरा असली, तरी त्याला साथ देण्यासाठी अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाजीसाठी शार्दुल ठाकूर यांची निवड होऊ शकते, असा अंदाज आहे. योखेरीज प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांची निवड निश्चित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : के एल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

झिम्बाब्वे : रेगिस चकाब्वा (कर्णधार), रियान बर्ल, तनाक चिवांगा, ब्रॅडली इव्हन्स, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काया, ताकुदजवानाशे कैतानो, क्लाईव्ह मंडाले, वेस्ले माधेवेरे, तदिवांशीशे मारूमनी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगा, रिचर्ड नगारवा, विक्टर न्याउची, सिकंदर रझा, मिल्टन शुंबा, डोनाल्ड तिरिपानो.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत